पी आय इंडस्ट्रीज च्या वतीने स्टिवर्डशिप डे साजरापी आय इंडस्ट्रीज च्या वतीने स्टिवर्डशिप डे साजरा.

एरंडोल (प्रतिनिधि)भारतातील अग्रगण्य कंपनी पी आय इंडस्ट्रीज लि. ने आपल्या कृषी व्यवसायाच्या प्रमुख कार्यक्रमाअंतर्गत आणि उत्पादनाच्या प्रसिद्धीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ रोजी सोनबर्डी तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे स्टिवर्डशिप डे उत्साहात आयोजित केला. या कार्यक्रमाला कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रविण राजपूत साहेब, मार्केटींग मॅनेजर प्रसाद गोरडे, तसेच श्रीकांत बोरसे, वैभव पालवे, समाधान पाटील आदी व सोबतच परिसरातील कृषी केंद्र चालक व सन्माननीय शेतकरी उपस्थित होते या वेळी प्रसाद गोरडे यांनी शेतकर्यांना कृषी निविष्ठा, कृषी रासायनिक पदार्थ यांच्या खरेदी पासून ते घरात साठवणुकीसाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे, त्यांचा योग्य वापर कसा करावा, फवारणी करताना वापरायचे किट याबाबत सखोल सचित्र व प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
जमलेल्या सर्व शेतकर्यांना अल्पोपाहाराची सोय कंपनीमार्फत केली होती. या कार्यक्रमानंतर शेतकर्यांनी त्यांच्या जिवाची खबरदारी घेणारी माहिती कंपनी प्रतिनिधी मार्फत सचित्र सादर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.