निलिमा बागुल एरंडोल आगार प्रमुखपदी..

एरंडोल(प्रतिनिधि)निलीमा बागुल यांनी आज एरंडोल आगारात पदभार स्वीकारला ,यावेळी प्रभारी आगार प्रमुख भारती बागले यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला एरंडोल आगाराचे तत्कालीन आगार प्रमुख विजय पाटील यांची जळगांव येथे आगार प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी नीलिमा बागुल यांची नियुक्ती झाली आहे एरंडोल आगारात त्यांचे कर्मचारी यांचे वतीने आगार प्रमुखांच्या दालनात स्वागत करण्यात आले यावेळी सहा कार्यशाळा अधिक्षक भारती बागले ,स्थानक प्रमुख गोविंदा बागुल, वाहतूक निरीक्षक योगिता ब्राहाटे मॅडम, कष्टकरी जनसंघाचे भगवान ब्रह्मे,निलेश पाटील,किशोर मोराणकर, श्रावण सोनवणे ,यांत्रिक सपकाळे ,सुनील पाटील , नारायण जाधव ,संदीप पाटील, इंटक चे आतिक शेख ,राहुल पाटील ,प्रशांत मोराणकर , तसेच मंगेश दलाल ,लेखकार ईश्वर चौधरी ,चेतन महाजन ,रवींद्र पाटील ,विलास पाटील ,बापू पाटील यांचे सह अनेक कर्मचारी उपस्थित होते यानंतर बागूल मॅडम यांनी विविध विभागांना भेट दिली व चर्चा करून आढावा घेतला