जूनी पेन्शन योजना लागू करण्यापुर्वी शासनाने गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णयाची जि.प.कर्मचाऱ्यांकडून होळी..

धुळे (अनिस अहेमद) सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप

पूकारण्यात आलेला आहे, संपाचा आज आजचा दुसरा दिवस होता काल दिनांक १४ मार्च २०२३ रोजी शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी एक अभ्यास समिती गठीत केली या समितीमध्ये कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांना घेतले नसल्यामुळे ही समिती आम्हाला मान्य नाही अशाच प्रकारची समिती सन १०१९ मध्ये देखील गठीत केली होती आणि म्हणून गठीत करण्यात आलेल्या समितीचा जो शासन निर्णय शासनाने काल निर्गमित केला त्या शासन निर्णयाची आज धुळे जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक स्वरुपात होळी करण्यात आली. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यासह धुळे जिल्हात देखील हा संप १००% यशस्वी होत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष श्री बलराज मगर जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचारी समन्वय समितीचे श्री दिनेश महाले, राजेंद्र नांद्रे, वनराज पाटील, सुनंदा निकम, डी.ए. पाटील, धीरज परदेशी, डी.एम. पाटील, किशोर पगारे, ज्ञानेश्वर बाविस्कर, सचिन गुंडेकर, रवींद्र खैरनार, दिपक महाले, मुकूंदा पगारे, संजय पाटील, नरहर पाटील, जयदिप पाटील, अनिलकुमार सोनवणे यांच्यासह हजारोंच्या संख्येने कर्मचारी क्युमाईन क्लबजवळ आंदोलनास्थळी उपस्थित होते.