अटल गुण्यातील आरोपी विशाल विजय सोनवणे याच्यावर एम.पी.डी. ए. कार्यवाही. तीन महिन्यात ३ गुन्हेगारांवर एम. पी. डी. कार्यवाही.

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही या पेक्षाही मोठी कार्यवाही करण्यात येईल. पोलिस निरीक्षक विजय शिंदे . अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर पोलिसांनी आज तिसरी धक्कादायक कार्यवाही विशाल विजय सोनवणे वय 27 राहणार फरशी रोड अमळनेर याच्यावर एम. पी. डी. ए. कारवाई आज करण्यात आली असून त्यास नागपूर सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. विशाल याच्यावर आज पावतो एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात व अमळनेर मध्ये दाखल आहेत. तसेच अनेक अदखलपात्र अपराध अमळनेर पोलीस स्टेशनला देखील दाखल आहेत.
त्याच्यावर दाखल गुन्ह्यांपैकी प्रामुख्याने मोटर सायकल चोरी करणे, महिलेचा विनयभंग करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, हिंदू मुस्लिम सारखे जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, लोखंडी फायटर मारून पिस्टल कपाळाला लावून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ३ गुन्हे देखील दाखल आहेत.
सदर धोकादायक इसम हा हद्दपार करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच अनेक वेळा त्याचे चांगले वर्तणुकीचे बॉण्ड घेऊन देखील त्याचे तो पालन करत नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यास भीती राहिलेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीने त्याने लोकांची मालमत्ता व जीवित धोक्यात आणले होते. तसेच धार्मिक सदभाव देखील धोक्यात आणला होता. त्याच्या दहशतवादी व गुन्हेगारी वृत्तीमुळे स्वतःच्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मनोदय देखील काही कुटुंबांनी बोलवून दाखविला होता. एकंदरीतच हृदय पिळून टाकणारी व डोळ्यातून पाणी आणणाऱ्या हृदय दावक लोकांच्या व्यथा होत्या त्याच्यावर अमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे त्याच्या क्रूर कृत्यांना व खुनशी वृत्तीला स्वतःच्या जीवनाला कंटाळलेल्या लोकांनी पहिल्यांदाच आता कोठे मोकळा श्वास घेतला आहे. असे सर्व पीडित लोक अमळनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे सुखावले आहेत व सुरक्षितपणाची भावना त्यांच्या मनात तयार झाली आहे.
एकंदरीतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यात अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगारांवर ३ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. च्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईच्या अमळनेरकरांकडून स्वागत झालेच आहे. मात्र आता अमळनेरच्या जनतेने त्यांच्या मनात श्री. विजय शिंदे यांना भावनिक स्थान दिले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मोठी ताकद मिळालेली आहे. अमळनेरच्या जनतेने त्यांना भावनिक व वैचारिक ऊर्जा दिली आहे. या कारवाईत प्रामुख्याने पोलीस अंमलदार किशोर पाटील, शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे व महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती अक्षदा इंगळे तसेच सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय वना पाटील चालक पोलीस हवालदार मधुकर पाटील चालक पोलीस शिपाई सुनील पाटील आणि संदेश पाटील हितेश चिंचोरे मिलिंद भामरे या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नजन पाटील साहेब यांची मदत व पाठपुरावा खूप मोलाचा आहे. तसेच त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये काम केले आहे.
जनतेस प्रताडीत करणारे व वेठीस धरणाऱ्या जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारांना परिणामकारक कारवाई केली पाहिजे यासाठी मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. एम राज कुमार साहेब यांची तीव्र इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेने व प्रेरित होऊन अमळनेर पोलिसांनी मा. अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री. रमेश चोपडे सर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर श्री. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे की, जनतेस वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. त्यांनी वेळीच सावध होऊन आता एकही गुन्हा करू नये अन्यथा त्यांच्यावर यापेक्षाही मोठी व कडक कारवाई करण्यात येईल.