घराचा कडीकोंडा तोडून ५३ हजाराची घरफोडी..

अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर घर मालक घरात झोपलेले असतांना घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम दागिन्यासह घरातील ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १४ रोजी रात्री घडली.
याबाबत असे की,शीतल दीपक पवार रा गणेश कॉलनी जि प विश्रामगृह मागे यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार १५ रोजी पहाटे ३ वाजता झोपेतून पाणी प्यायला उठली असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला.म्हणून घरातील कपात बघितली असता त्यातील २० हजार रुपये रोख,२५ हजार किमतीचे १ तोळ्याची सोन्याची पोत,६ हजार किमतीचे २ ग्रॅम सोन्याचे कानातले, अडीच हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले.याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.