अंमळनेर शाहआलम नगर येथे डुकरांची वाढती संख्या ठरते डोकेदुखी …

अमळनेर (प्रतिनिधि) शाह आलम नगर येथे डुकरे व कुत्रे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .
नगरपालिका प्रशासनाने विकास कामे व विकास योजनांच्या अंमलबजावणी बरोबर शहरवासीयांना होणाऱ्या त्रासापासून डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी अशी शाआलम नगर वासियांची मागणी आहे.