केंद्र सरकारच्या मदतीने बचत गट लहान व्यावसायिकांना आत्मनिर्भर होण्याची सुवर्णसंधी.

खासदार उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन.
जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोल येथे आत्मनिर्भर अभियानाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद.
शेकडो महिलांनी केली आरोग्य तपासणी.
केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून निधिचे वाटप.

एरंडोल (प्रतिनिधि) केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनाबाबत आपल्या मनातील नकारात्मकता बाजूला सारा विविध योजना समजावून घेऊन त्यांच्यासाठी पाठपुरावा करा. जिथे अडवणूक होईल ती अडचण जाहीर मांडा. बचत गट असो वा लहान व्यावसायिक केंद्र सरकार योजनांच्या माध्यमातून आपल्या पाठीशी खंबीर उभे असून महिला भगिनींना आत्मनिर्भर होण्याची ही मोठी सुवर्णसंधी असून येत्या काळात स्वत:ची आर्थिक उन्नती करीत परिसराच्या महिला भगिनींना आत्मनिर्भरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आज एरंडोल शहर व तालुक्यातील महिला भगिनी युवतींसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा महिला आत्मनिर्भर अभियान राबविण्यात आले. एरंडोल येथील पांडव वाड्याजवळील सिताराम भाई मंगल कार्यालयात त्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रचंड संख्येने माता भगिनी उपस्थीत होत्या. सुरूवातीला गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी प्रास्ताविकातून अभियानाचे महत्व विषद केले.
यावेळी विविध महागड्या वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या. सुरुवातीला बचत गटांच्या महिला भगिनींनी लावलेल्या विविध स्टॉलवर जाऊन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पदार्थांची चव घेत त्यासाठी महिलांनी घेतलेले कष्ट व पाककृती समजावीत महिला भगिनींचा उत्साह वाढविला. तसेच लहान व्यवसायिकांना पंतप्रधान स्व. निधि वाटप तर बचत गटांना कर्जाची रक्कमेचा धनादेश तसेच फेरीवाला यांना माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश व ओळखपत्रांचे यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. नगराध्यक्ष रमेश काका परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आठ तालुक्यामध्ये अभियान राबविण्यात आले.महिलांचा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळाला याचा आनंद असून गेल्या पंधरवाड्यात दिव्यांग बांधवांचा मेळावा आणि आजच्या मेळावा यामुळे लोकप्रतिनिधी कसा असावा यांचे आदर्श उदाहरण उन्मेश दादांच्या रुपात पाहायला मिळते. जनतेच्या भल्यासाठी योजनाच्या मदतीने नवी उभारी समाजाला देण्याची त्यांची धडपड आम्हाला प्रेरीत करते अशी भावना नगराध्यक्ष रमेश काका परदेशी यांनी व्यक्त केली. ऍड.शिवाली पाटील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश काका परदेशी, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष नितिन महाजन, सचिन विसपुते, तालुका सरचिटणीस सरपंच खडके राजेंद्र पाटील, भाजपा शहराध्यक्ष निलेश परदेशी, उपाध्यक्ष विवेक ठाकूर,गटविकास अधिकारी दादाजी जाधव,तालुका कृषी अधिकारी बोरसे साहेब,उमेद जिल्हा व्यवस्थापक हरीश भोई, विस्तार अधिकारी शिवाजी गुरगुडे, महीला बालकल्याण च्या चौधरी मॅडम, शहर अभियंता हर्षल पाटील,महिला आघाडी अध्यक्षा सरलाताई पाटील, शहराध्यक्षा शोभाताई साळी, अभियान समन्वयिका तथा माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे, ऍड.शिवाली पाटील देशमुख, आरती ठाकूर, विखरणचे सामाजिक कार्यकर्ते कल्पेश पाटील, मयूर ठाकूर उमेद व्यवस्थापक गुलाब चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी महिला बचत गटाच्या सदस्य आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका माता बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस तथा खडके सरपंच राजेंद्र पाटील यांनी तर आभार शहराध्यक्ष निलेश परदेशी यांनी मानले.