पायी दिंडीच्या 50 व्या वर्षानिमित्त यंदा सुवर्ण महोत्सव साजरा .


एरंडोल (प्रतिनिधि) श्री.क्षेत्र सुकेश्वर देवस्थान ता एरंडोल येथील वार्षिक सर्वसाधारण सभा .विजय नामदेव भामरे यांचे अध्यक्षतेत नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला जेष्ठ सभासद . संतोष विठ्ठल पाटील, रवणजे,.पांडुरंग पाटील,जळगाव व अध्यक्ष विजय भामरे यांचे शुभहस्ते भगवान भोले शंकर व श्री.शुकमुनी महाराज यांचे पूजन करण्यात आले. सभेच्या प्रारंभी रवणजे येथील माजी विश्वस्त कै. ह भ प झगा माळी रवणजे कर व कै ह भ प अशोक मराठे जवखेडे कर सुकेश्वर दिंडीचे चोपदार आणि देशातील वीरमरण झालेले सैनिक व कोरोना कालावधी त मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वहाण्यात आली. त्यानंतर देवस्थान चे जेष्ठ सदस्य श्री रमेश दुसाने अण्णा, भुसावळकर ,रवणजे येथील सरपंच नामदेव आधार माळी,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते .सीताराम पाटील, . महारु तात्या, शिवाजी कोळी,माजी सरपंच रवणजे, ,गोपाळ कोळी, उपाध्यक्ष सुकेश्वर, श्री.प्रकाश घुगे, .प्रकाश रोकडे .महारु पाटील यांचेसह विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर देवस्थान अहवाल, मागील सभेचे प्रोसिडिंग, ऑडिट रिपोर्ट,पुढील वर्षाचे अंदाज पत्रक वाचन करण्यात आले. याप्रसंगी मा. अध्यक्ष विजय भामरे यांनी सुकेश्वर येथील प्राचीन शिव मंदिर 51 फुटी नूतनीकरण बाबत व सुकेश्वर ते पंढरपूर दिंडीला यंदा 50 वर्षे पूर्ण होत असल्याने सुकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले.त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील देवस्थान च्या मठाचे नाव श्री. क्षेत्र सुकेश्वर देवस्थान संचलित वै.गुरुवर्य ह भ प नामदेव महाराज भामरे मठ , पंढरपूर असे करण्याचा ठराव जेष्ठ सदस्य श्री शालीकराम पाटील पिंपळ कोठे कर यांनी मांडला तो बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच सुकेश्वर येथे होणाऱ्या शुद्ध एकादशी वारीतील ज्ञानदाते यजमान साठी 5100 रु. बाबत आवाहन केले असता एक वारीचे यजमानत्व श्री.भुरा लढा महाजन खर्ची बु यांनी स्वीकारले बाबत जाहीर केले.शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री विजय भामरे यांनी श्री नानाभाऊ महाजन, माजी जि प सदस्य यांनी खर्ची ते सुकेश्वर रस्त्याचे डांबरी करण व पाण्याची टाकी तसेच श्री मोहन भाऊ कोळी माजी सभापती पंचायत समिती एरंडोल यांनी मोठे हॅलोजन फोकस लावून दिले बद्दल व श्री.रवींद्र सोनू बेंडाळे जळगाव यांनी 21000 रु शिव मंदिर करीता दिल्याबद्दल तसेच कीर्तनकार, भजनी मंडळ विविध अन्नदाते , देणगीदाते, यांचा अभिनंदन ठराव मांडून सहकार्य करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी अजित पाटील, महारु पाटील, दिनेश पाटील, उजवल पाटील,खर्ची खुर्द धर्मा भाऊ उपसरपंच रवणजे, संजय बुधा पाटील, प्रेमराज मराठे,श्री सागर महाराज, धर्मा चौधरी, महेश पाटील, रमेश भिला पाटील, गोकुळ महाराज , केतन महाजन, दिनेश पांडे,युवा कार्यकर्ते, गणेश चौधरी, श्री नामदेव चौधरी, बापू कोळी, संदीप तायडे, वैभव विजय भामरे श्री विठ्ठल कोळी, धनराज पाटील, गजानन पाटील,लमाजन यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्र संचलन त्र्यंबक पाटील पुजारी तर आभार प्रदर्शन .समाधान कोळी सचिव सुकेश्वर यांनी केले.