मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश….

0

अमळनेर (प्रतिनिधि) मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अमळनेर येथुन ताब्यात घेण्यात यश आले चोपड़ा व अमळनेर परिसरातील वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमीत केल्या होत्या. त्याप्रमाणे श्री. किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार स.फौ. रवि नरवाडे, पोहेकॉ राजेश मेंढे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ गोरख बागुल, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेका/संदिप पाटील, पोहेकॉ/ संदिप साळवे, पोना/ प्रविण मांडोळे, पोना/ ईश्वर पाटील, पोकॉ/लोकेश माळी, चापोकॉ. अशोक पाटील अशांचे पथक तयार करून त्यांना चोपडा व अमळनेर शहर तालुका परिसरातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी मार्गदर्शन केले व परिसरात नियमीत पेट्रोलिंग सुरु ठेवणेस सांगितले.

दि. १८.०३.२०२३ रोजी वरिष्ठ पोनि. श्री. किसन नजनपाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की.. एक इसम विना क्रमांकाची एचएफ डिलक्स मो.सा. वर अमळनेर शहरात फिरत असून त्याचे ताब्यातील मो.सा. चोरीची असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली आहे. पोनि. श्री. किसन नजनपाटील यांनी वर नमूद पथकास तुम्ही तात्काळ सदर ठिकाणी जावून त्या इसमाचा शोध घ्या व बातमीची शहानिशा करा असे कळविल्याने वरील स्था.गु.शा. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून नमूद इसमाचा शोध घेवून त्यास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अजय अंबालाल पावरा वय २७, रा. वकवड (बोराडी) ता. शिरपुर जि. धुळे असल्याचे सांगितले व त्याचे ताब्यातील मो.सा. बाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचेवर संशय आला म्हणून पथकाने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस करता त्याने त्याचे ताब्यातील मो.सा. चोरीची असल्याचे सांगितले तसेच त्याने अमळनेर शहरात तसेच मध्यप्रदेश राज्यात मो.सा. चोरी केल्याची माहिती दिली असून आरोपी कडुन एकुण १४ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपीने अमळनेर शहरात चोरी केलेल्या मो.सा. संदर्भात खात्री करता अमळनेर पोस्टे. गुरनं. ११/२०२३ भादंवि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यास रिपोर्टसह पुढील कारवाईकामी अमळनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!