तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा – बौध्द समाजाची मागणी…

रावेर दि. 25 (राहत अहमद) जळगाव येथील तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी रावेर तालुका बौध्द समाजाच्या वतीने पोलीस उप निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मागण्यांचे निवेदन देवून करण्यात आली .
दि . 16 मार्च रोजी पहाटे तीन वाजता पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून येथील पूर्वाश्रमीच्या बौद्ध वस्तीत (रेडक्रास सोसायटी समोर) 1983 पासून स्थापन असलेल्या तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र केले, ह्या गैरकृत्या मुळे सर्व आंबेडकर जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहे .आरोपी प्रशांत देशपांडे व अमित पाटील यांना तात्काळ अटक करावी . आरोपींनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर असून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याने कलम १२० (ब) ही लावण्यात यावे.दि .16 मार्च ते आज 10दिवस उलटूनही पोलीस आरोपीला पकडू शकले नाहीत ही बाब अत्यंत खेदजनक असून गंभीर आहे. विधान परिषदेत दोन वेळा चर्चा होवून व उपसभापतीनी आदेश देवून सुध्दा पोलीस यंत्रणा आरोपीला पकडू शकत नाही , यामुळे सामान्य लोकांना काय न्याय मिळेल असा प्रश्न उभा राहतो , आणि जनतेच्या भावना संविधानाच्या चौकटीत तीव्र असून आपण आरोपींना अटक करान न्याय द्यावा अथवा कायदेशीर पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलीप कांबळे कामगार नेते बाळू शिरतुरे ता . अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , संगरक्षक तायडे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खैरे ,नितीन तायडे ,धनराज घेटे ‘संघरत्न दामोदर ,चांगो भालेराव , दिलीप पानपाटील , महेंद्र वानखेडे, आशिष घेटे यांनी केली आहे .