रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक टी. बी डे. साजरा..

.
अमळने (प्रतिनिधि) रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिवस (टी.बी डे ) साजरा करण्यात आला. याप्रसंगी रोटरी सभासदांच्या सहकात्याने

मा.पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत “निक्षय मित्र ” या उपक्रमाद्वारे क्षयरोग बाधित रुग्णांना *कोरडा पोषण आहाराचे रुग्णांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. प्रतीक जैन यांनी केली.*YES WE CAN END :TB या वर्षाचे रोटरीचे ध्येय साध्य करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉ.जी एम पाटील यांनी क्षयरोग नियंत्रण करणे शक्य आहे व सांगितले की निक्षय मित्र च्या अंतर्गत क्षयरोग रुग्णांना ६ महिन्यासाठी दत्तक घेतले जाते. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अमळनेर डॉ. पि.के.ताडे यांनी सांगितले की “क्षयरोग रुग्णांबरोबर योग्य ते सहकार्य व सदभावना सर्वांनी बाळगली पाहिजे व त्यांनी क्षय रोगाबाबत राबवित असलेले व क्लब ने पाच गरजू रुग्णांना दत्तक घेतल्याबद्दलचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या बद्दल रोटरी क्लब अमळनेरचे आभार मानले. याप्रसंगी प्रेसिडेंट रो कीर्तिकुमार कोठारी,क्लब सेक्रेटरी- रो.ताहा बुकवाला,प्रोजेक्ट चेअरमन रो.डाॅ जी एम पाटील,को-प्रोजेक्ट चेअरमन रो. डाॅ शरद बाविस्कर, रो.प्रतीक जैन,रो.देवेंद्र कोठारी, रो.महेश पाटील तसेच कर्मचारी सदस्यांपैकी श्री.निलेश पवार , श्री संदिप आहिरराव, श्री गणेश कुवर, श्री राजेंद्र चंद्रात्रे श्री रमाकांत सैंदाणे, डी आर टी बी कॉन्सिलर दीपक संदांन शिव जळगाव, किशोर सौदाणे चोपडा आणि आशा सेविका आदी टी बी कर्मचारी उपस्थित होते .