अमळनेर येथील पो नि, विजय शिंदेंच्या मध्यस्थीने टाॅक्सी युनियनच्या उपोषणाची सांगता…

0

अमळनेर ( प्रतिनिधी ) नुकताच महाराष्ट्र शासनाने महिलांना बस प्रवासात 50% प्रवास सवलत जाहीर केल्याच्या निषेधार्थ अमळनेर मेन्स टॅक्सी चालक-मालक संघटना पदाधिकारी हे दि.२३/0३/२०२३ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.
त्यानंतर आज रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची स्वतः वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांना तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो असे आश्वासित करून समजूत घालून त्यांचे मन परिवर्तन केले व उपोषणकर्ते यांचे दि.२३/३/२०२३ रोजी पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण दि.२५/३/२०२३ रोजी अमळनेर येथील मा.पोलिस निरीक्षक.श्री.विजय शिंदे यांच्या प्रयत्नाने सोडविलेले आहे.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे व नायब तहसीलदार श्री.लांडगे यांनी अंमळनेर मेन्स टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्रित रित्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!