चोरट्यांनी फोडली उसाची रसवंती. १ लाख १५ हजाराचा सामान लंपास…

एरंडोल (प्रतिनिधि)येथे अंजनी धरण परीसरात कासोदा रस्त्यालगत असलेल्या उसाच्या रसवंतीच्या शेडचा पञा वाकवुन १लाख १५हजारांचा सामान लंपास करण्यात आला.
हा प्रकार २१ मार्च २०२३ च्या राञी घडला असून २२ मार्च रोजी सकाळी चोरी झाल्याचे आढळुन आले.
चोरीस गेलेल्या सामानामध्ये उसाचा रस काढण्याचे यंञ, ४बँटर्या,फ्रिज,इन्वहर्टर इत्
यादी समाविष्ट आहे.
उखर्डू वाल्डे यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
