जळगाव धुळे नंदुरबार ह्या तीन जिल्ह्याची आमदार अनिल पाटलांच्या खांद्यावर जबाबदारी…

संघटना बांधणी,निवडणुक नियोजन, आणि बूथ यंत्रणा सक्षमीकरण अश्या मोठ्या जबाबदाऱ्या.

अमळनेर (प्रतिनिधि ) भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाची महत्वाची मुख्य जवाबदारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजून एक भार त्यांच्या खांद्यावर ठेवत जळगाव धुळे आणि नंदुरबार अश्या तीन जिल्ह्यांची मोठी जवाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
आमदार अनिल पाटील यांचि काम करण्याची पद्धत व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना बांधणी , निवडणूक नियोजन आणि महत्वाचे म्हणजे बूथ यंत्रणा सक्षमीकरण अशी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सदरची नियुक्ती केली असून जवाबदारी खांद्यावर येताच आमदार पाटील कामाला देखील लागले आहेत.पहिल्

या टप्प्यात बूथ कमिटी बांधणी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे.त्याअनुषंगाने तिन्ही जिल्ह्याचे म्हणजेच खान्देश विभागाचे बूथ प्रमुख ते असणार आहेत.आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी पक्षाची संघटना बूथ पातळीपर्यंत मजबूत करणे आवश्यक आहे, त्यासाठी बूथ बांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आगामी दोन महिन्यात तिन्ही जिल्ह्यात बूथ बांधणी त्यांना करावी लागणार आहे.त्यादृष्टीने तिन्ही जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने बैठका घेऊन योग्य ते नियोजन करणार आहेत.
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर आलेली मोठी जवाबदारी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.