पाळधी दंगलीचा कुल जमाती कौन्सिल जळगाव तर्फे तीव्र निषेध..

पोलीस अधीक्षकाशी शिष्ट मंडळाचे सुसंवाद
जळगाव (प्रतिनिधि ) २८ मार्च रोजी पाळधी येथे रात्री दिंडीवर झालेल्या दगडफेकीचा तीव्र शब्दात निषेध करून समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई केल्याबाबत पोलिसांचा अभिनंदन सह पोलीस विभागातर्फे काही बाबींबाबत अधीक्षक एस राजकुमार यांचे सह गुरुवारी संध्याकाळी कुलजमाती कौन्सिल च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सुसंवाद साधला

२) निवेदन देतांना सैयद चाँद सोबत फारूक शेख,मुफ्ती अतिकुर रहेमान,करीम सालार, मुफ्ती हारून, सोहेल अमीर, अन्वर खान व अनिस शाह दिसत आहे
त्यात प्रामुख्याने दंगलीत जे निरपराध तरुणांना अटक झालेली आहे त्याची पडताळणी करून त्यांची त्वरित सुटका करणे , दगडफेक ज्या ठिकाणी सुरू झाली व नंतर आटोक्यात आली त्यानंतर गावामध्ये झालेल्या तोडफोड, लूटमार व आग लावल्याबद्दल
त्या ११ दुकानदारांना व वाहन मालकांना नुकसान भरपाई मिळवून द्या व तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणे , रमजान पर्व व हिंदू धर्मियांचे उत्सव सुरू असल्याने पाळधी गावातील काही पुरुषवर्ग हा घराबाहेर निघून गेला असल्याने पोलीस दलामार्फत विश्वास देऊन त्यांना आपापल्या घरी येण्याचे आवाहन करण्यात यावे जेणेकरून गावात शांतता निर्माण होण्यास मदत होईल, एफ आय आर मध्ये अशी काही नावे आहेत की घटना घडली त्यावेळी हे तरुण दुसरीकडे आपली प्रार्थना करीत होते व तसे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने त्यांच्या बाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा सात बाबींवर चर्चा करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांची सकारात्मक उत्तरे
पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांनी शिष्टमंडळाचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक उत्तरे दिली ज्याप्रमाणे निरपराध तरुनाणाअटक झाली त्याचप्रमाणे जे अपराधी तरुण फरार आहे त्या तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन करा, ज्या ट्रक ने चिरडण्याचा प्रयत्न केला गेला त्या ट्रकला चालकासह जमा करा, तरुण व खास करून तारुण्यात प्रवेश करणाऱ्या युवकांना धर्मासोबतच सामाजिक उपदेश करा.खास करून जे आपले संरक्षण करतात त्या पोलीस दलांवर हल्ला करू नका अशी शिकवण त्यांना द्या ,पोलीस हा कोणा एका समाजासाठी किंवा धर्माचा नसतो तो संपूर्ण मानव जातीसाठी कार्यरत असतो याचे भान तरुणांना द्या अशा प्रकारचे उपदेश देऊन कोणासोबतही अन्याय होणार नाही व जे निरपराध असतील त्यांच्या बाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल असे शिष्टमंडळाला आश्वासित केले.
शिष्टमंडळा तर्फे यांनी केली चर्चा
सर्व प्रथम फारूक शेख यांनी ७ विषय मांडले जे निवेदनाच्या मॅक
माध्यमातून देण्यात आले. सैयद चाँद,करीम सालार,मुफ्ती अतिकउर रहेमान,मुफ्ती हारून नदवी, सोहेल अहेमद यांनी सुद्धा चर्चेत सहभाग घेतला.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
कुल जमाती कौन्सिलच्या माध्यमाने गेलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष सय्यद चांद ,सचिव डॉक्टर जावेद , शहर ए काजी मुफ्ती अतिकुर रहमान ,जमेत उलमाचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, जमाते इस्लामी चे अध्यक्ष सोहेल आमिर, ईकरा सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, एम पी जे चे अध्यक्ष महमूद खान व आरिफ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांचे अध्यक्ष मजहर खान, एम आय एम चे नगरसेवक रियाझ बागवान वहदत इस्लामी चे अध्यक्ष अतिक अहमद, मुस्लिम ईदगा ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा ,शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान ,फर्स्ट एड फाउंडेशनचे अध्यक्ष शकील हंनान, मेमन बिरादरीचे बशीर बुऱ्हानी, ज जमियात उलमाचे हाफिज रहीम कुल जमातीचे शेख नईम बशीर आदींची उपस्थिती होती.