उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे अधिकाऱ्यांचा सन्मान..

.
एरंडोल (प्रतिनिधि) उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटना नाशिक विभागातर्फे नाशिक विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गेल्या २० वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन मिळावे म्हणुन विविध संघटना,पदाधिकारी,शिक्षक आणि शिक्षिका संघर्ष करीत आहेत.त्यास आशादायी यश नुकतेच मिळाले.या यशात जितका वरील लोकांचा आहे तितका सहभाग प्रशासनिक अधिकारी यांचा देखील असल्याने त्यांचा संघटनेतर्फे नाशिक येथे जाऊन सन्मान करण्यात आला.६ फेब्रुवारी २०२३ रोजी अनुदान मंजुरी चा शासन निर्णय निर्गमित झाला.यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या व नुकताच अनुदान टप्पा वाढीचे पत्र शाळांना मिळत आहे.यात नव्याने २० टक्के मंजुर झालेल्या,घोषित व त्रुटीपात्र शाळांना शालार्थ मिळून वेतन ३१ मार्चच्या आत मिळणार आहे.त्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मैदान,मंत्रालय,विधान भवन येथे संघर्ष करुन अनुदान पदरात पाडून घेतात.पण प्रत्यक्षात अनुदान खात्यावर पाडून घेण्यासाठी प्रशासनिक अधिकारी मोलाची भुमिका बजावत असतात.असाच अनुभव नाशिक विभागीय प्रशासकीय अधिकारी यांचा विना वेतन काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आला.नाशिक विभागातील नाशिक,जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिह्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपसंचालक बी.बी.चव्हाण साहेब, पुष्पावती पाटील मॅडम,दिनेश देवरे साहेब,जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव,सहाय्यक शिक्षण निरीक्षक दिपाली पाटील तसेच चारही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागीय अधिकारी यांनी रात्रं दिवस कामे करुन शिक्षकांना न्याय मिळवुन दिला.यावेळी संघटनेचे पदाधिकारी राज्य सचिव प्रा.अनिल परदेशी,प्रा.कर्तारसिंग ठाकुर,प्रा.गुलाब साळुंखे,प्रा.विजय गिरासे,प्रा.विशाल अव्हाड,प्रा.वर्षा कुलथे,प्रा.निलेश पाटील,प्रा.सतिष पाटील तसेच पदाधिकारी यांनी नाशिक येथे प्रत्यक्ष भेटुन सन्मान केला.शिक्षकांच्या या लढ्याला मार्गदर्शन प्रा.सुनिल गरुड व प्रा.शैलेश राणे यांनी केले तर अनुदान मंजुरीसाठी आमदार सत्यजित तांबे,किशोर दराडे,किरण सरनाईक,आमदार आसगावकर यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटुन प्रयत्न केले.