एरंडोल येथे पांडव नगरी बहुद्देशीय संस्था तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळा व संगीतमय श्रीराम कथा सजिव देखावा संपन्न..

एरंडोल ( प्रतिनिधि ) येथे पांडव नगरी बहुद्देशीय संस्था तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळा व संगीतमय श्रीराम कथा रोजी कलश यात्रा निघणार आहे. रामनवमी नियमित्त संगीतमय श्रीराम कथा सजिव देखावा श्री विजय कुमार जी पलोड ( छत्रपती संभाजी नगर) यांचा सुमधुर वाणीतून आयोजित केली होती.
कथा ची शुरुवात २३ रोजी कलश यात्रे पासून झाली व दर दिवशी ११जोळ्याचा हस्ते महा आरती चे आयोजन करण्यात आले होते. त्याज दिवशी शिव-पार्वती विवाह उत्सव झाले.२४ रोजी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मोत्सव सोहळा.२५ रोजी श्रीराम विवाह सोहळा.२६ रोजी श्रीराम व भरत मिलाप सोहळा.२७ रोजी श्रीरामला शबरी चे बोर.२८ रोजी रामेश्वर पूजन सोहळा.२९ रोजी श्रीराम राजतिळक सोहळा चे सहजिवन करण्यात आले होते.दरदिवशी सकाळी ५ वा. काकड आरती तसेच संध्याकाळी ६ वा हरिपाठ कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते.
३० रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा व संध्याकाळी शहरात श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली होती तसेच ३१ रोजी सकाळी युवा किर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज नाशिककर किर्तन झाले व काळेचा प्रसाद . त्यानंतर महाप्रसाद(भंडारा) चा लाभ भाविकांनी घेतला.
सदर कार्यक्रम चे आयोजन श्रीराम मंदिर, कासोदा दरवाजा, परदेशी गल्ली, एरंडोल येथे सांगता झाली.