केंद्र राहुल गांधीं सोबत सूडबुद्धीने वागत असल्याचा केला पत्रकार परिषदेत आरोप…

.
एरंडोल ( प्रतिनिधि )
एरंडोल केंद्र राहुल गांधीं सोबत सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप एरंडोल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात दि.१ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पक्षाचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केंद्र सरकार हे राहुल गांधी यांच्या विषयी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप करून राहुल गांधी यांची लोकप्रियता बघून भाजपाने त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी कुटील डाव रचला असल्याचा आरोप करून केंद्र सरकार विरोधी पक्षावर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रसंगी प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस पक्ष जे.पी.सी.ची मागणी करताच कामकाज स्थगित करण्यात आले व अदानीला वाचवण्यासाठी सरकार सदर कारवाई करीत असल्याचा आरोप करून मोदी सरकार विरोधकांना शत्रू सारखी वागणूक देत असून निकाल लागल्याबरोबर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली हे लोकशाहीला मारक असल्याचे सांगून या प्रकरणात काँग्रेस आता कुठेही तडजोड न करता हाथ से हाथ जोडो अभियान राबवणार असल्याचे सांगून केंद्र सरकार कशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर देशात अनेक आंदोलना मार्फत केंद्र सरकारचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सांगितले.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश महाजन यांनी सुद्धा केंद्र सरकारवर सडकून टीका केली व सदर पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू विशद केला. याप्रसंगी युवा नेते डॉ. फरहाज बोहरी,अल्पसंख्यांक आघाडीचे कलीम शेख, ओबीसी आघाडीचे राजेंद्र चौधरी, बबन वंजारी, सुरेश पवार, अंजुम हाश्मी, डॉ.प्रशांत पाटील, इमरान सय्यद,भिकाजी अहिरे, दिपक पाटील, संजय पाटील, शे.सांडू, जाकीर यांचासह कार्यकर्ते उपस्थित होते..