कळंमसरे येथे विविध आजारांवर मोफत शिबिराचे आयोजन..

0

कळमसरे येथिल शिबिरात 200 रुग्णांची तपासणी

अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कळमसरे येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल अंतरिक्ष दातांचा दवाखाना अमळनेर तसेच व कळमसरे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर गावातील गणपती हॉस्पिटलमध्ये नुकतेच पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन येथील गणपती रुग्णालयाचे संचालक डॉ.भूषण पाटील व डॉ. शुभांगी पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत, डॉ सतीश सोनवणे,मुरलीधर चौधरी,रामचंद्र पाटील, योगेंद्र राजपूत, सी. एस .पाटील,प्रभाकर माळी आदी उपस्थित होते.शिबिरात हृदयरोग, डायबेटीस, दमा, टीबी,थायरॉईड व दनतरुग्ण अशा आजारांवर हे शिबिर आयोजित केले गेले होते. यावेळी सुमारे 200 रुग्णाची तपासणी केली गेली.अमळनेर शहरातील नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ.विजय धनगर व दंत चिकित्सक डॉ.शुभम झाबक यांनी उपस्थित रुग्णाची तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात येऊन ठराविक रुग्णांना औषधी देखील मोफत वाटप केली गेली.
दरम्यान या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला;
सूत्र संचलन आशिष छाजेड यांनी केले,डॉ भूषण पाटील यांनी आभार मानले!✍️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!