रमजानच्या पवित्र महीन्यात आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा. राष्ट्रवादीच्या वतिने मागणी…

धुळे (प्रतिनिधि) ३ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या पत्राद्वारे तथा मार्गदर्शनाखाली माननीय धुळे जिल्हाधिकारी साहेब यांना रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांच्या मुख्य सणानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा सर्व मुस्लिम बांधवांसाठी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीच्या स्वरूपाचे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
हिंदू बांधवांच्या दीपावली सणानिमित्त सर्व हिंदू बांधवांसाठी राज्य शासनाकडून स्वस्त दरामध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. त्याच योजने प्रमाणे माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून तातडीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांना सणा निमित्ताने जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या माध्यमातून आज निवेदनामध्ये देण्यात आलेल्या शिफारशी सह व्यवस्था करण्या संबंधी विनंति करण्यात आली.
यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीणचे अध्यक्ष सलीम भाई शेख,धुळे शहराध्यक्ष जमीर भाई शेख,ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर,अल्पसंख्यांकचे पदाधिकारी अझहर भाई पठाण, असलम भाई खाटिक, इमरान मिर्झा,मो.जमीर,आबिद मण्यार, रईस मंसूरी आदी तसेच कार्यकर्ते उपस्थित होत..