एकरुखी चे तोरणाई माता व धार येथील लोकमान्य पॅनल विजयी..

0

एकरूखी आणि धार वि. का.सोसायटीवर आमदार अनिल पाटील यांचे वर्चस्व…

अमळनेर ( प्रतिनिधि)अमळनेर तालुक्यातील एकरुखी चे तोरणाई माता आणि धार येथील लोकमान्य पॅनल विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकित भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या समर्थकांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
एकरूखी येथे सरपंच प्रा.सुरेश पाटील व जगन्नाथ चुडामन पाटील यांचे तोरणाई माता पॅनल चे विजयी होऊन राष्ट्रवादी चा झेंडा फडकला आहे.या पॅनलचे प्रभाकर देविदास पाटील, मिराबाई भानुदास पाटील, सुमनबाइ हिरामण पाटील, रवींद्र नथू पाटील, सुभाष आत्माराम पाटील, वामन आसाराम पाटील, बाळू नारायण भिल हे विजयो झाले.हिरामण आबा पाटील, नंदलाल पाटील, किशोर पाटील, विठ्ठल पाटील ,राहुल पाटील, लालू आबा ,आकाश पाटील ,गोविंदा भिल, मंगल नाईक, प्रियाल पाटील, रामकृष्ण पाटील यांनी पॅनल विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले.
तसेच धार विकासो मध्ये भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांचे नेतृत्वाखाली गणेश धोंडू पाटील यांचे लोकमान्य पॅनल विजयी झाले.यात सर्वसाधारण मतदारसंघ मयूर हिम्मतराव पाटील, तुळशीराम भादू पाटील, शशिकांत सखाराम पाटील, दिलीप यशवंत पाटील, भटाराम धुडकु पाटील, नाज अहमद मुजावर उर्फ बाबू पेंटर, रमेश दगडू सैदाने न्हावी ओबीसी मतदासंघ मिलिंद सुरेश पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ बुधागिर डीगागिर गोसावी, महिला राखीव मतदारसंघ मनीषा भूषण पाटील, सुमनबाई मधुकर पाटील अनुसूचीत जाती जमाती मतदारसंघ पदमाबाई पुंडलिक सैदाणे आदी विजयी झाले.
दोन्ही सोसायटी मधील विजयी उमेदवारांचा आमदार अनिल पाटील यांनी सत्कार केला.यावेळी जि प सदस्या सौ जयश्री पाटील,दोन्ही पॅनलचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!