अमळनेर शहराचे नाव नॅशनल स्पर्धेत. पायाच्या अपंगावर मात करत रौप्य पदक मिळविले…

अमळनेर (प्रतिनिधि) नॅशनल प्यारा पॉवरलिफ्टिंग न्यू दिल्ली मध्ये ब्रोंन्झ मेटल मध्ये दिनेश शशी बागडे याने रौप्यपदक मिळवले. वजनगट 107 मधून तिसय्रा क्रमांकाने विजयी. बेस्ट बेंच 151 किलो मारला. आपल्या एका पायांच्या अपंगावर मात करत

विजय मिळवला व अमलनेर शहराचे नाव चमकले नॅशनल स्पर्धेत……….. त्यावेळी किशोर भाऊ महाजन व मसल्स फॅक्टरी व क्रास फिट जिम चे विषेश आभार मानले. तरूणांना निर्व्यसनी सुदृढ आरोग्य ठेवण्याचे आवाहन केले. तरूणांनी आपली ताकत अभ्यास शरीर तंदुरुस्त साठी व्यायाम करण्याचे आवाहन केले. शारीरिक अपंगावर मात करता येते. माणूस खचतो मानसिक अपंगत्व आल्यावर , स्वतः मधील शक्ती ओळखा व संधीचे सोने करा. आपल्या मधील एक पाय नसल्याची सहानूभूती मिळवून जगणे नापसंत करत स्वाभिमानाने ताठ कणाने उभा राहणारा हा तरूण , युवा वर्गाचा गळातील ताईत आहे. आपल्या शक्तीचा वापर समाजकल्याण साठी देशाची शान वाढवण्यासाठी करेल… असे म्हणत विजयांचे आनंद अश्रू दाटून आले. किशोर भाऊ महाजन यांनी योग्य मार्गदर्शन प्रशिक्षण दिल्याने सहकार्य लाभले. म्हणून त्याचे आभार… सर्व हातपाय सुदृढ लाभलेल्या तरूणांनी दिनेश भाऊ बागडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा…