महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण. आमदार फारुक शाह यांच्या हस्ते…

धुळे (अनिस अहेमद)महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे नूतनीकरण धुळे जिल्ह्याचे आमदार डॉक्टर फारुक शहा यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांचे लेझिम पथकाद्वारे स्वागत केले क्रांती सेनेच्या

पदाधिकारी यांनी आमदार यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार फारुक शहा पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे साहेब, हिलाल अण्णां , माळी, डॉक्टर सुशील महाजन ,डॉक्टर दीपश्री नाईक आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.