अमळनेर आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराच्या व उध्द्धट वागणुकीच्या विरोधात तीव्र आंदोलन..

0

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर येथील आगार प्रमुख यांच्या मनमानी व उद्धट वागणुकीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले बस स्थानक आगार प्रमुख इम्रान पठाण हे मनमानी व उध्दट कारभार करतात, रजेचा पगार सह पगाराच्या मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करण्याच्या विरोधात काम बंद चे आंदोलन करीत जाब विचारण्यासाठी आगार प्रमुखाच्या कार्यालयात गेले दरम्यान सदर घटनेचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला आगार प्रमुख इम्रान पठाण यांनी अरेरावी करीत वृत्तांकन करण्यास मज्जाव करून मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्न केला व शिपायाला बोलवून पत्रकारांना कार्यालय बाहेर काढण्यास सांगितले.अश्या उद्धट अधिकाऱ्यावर सरकारने कडक कारवाई करावी व कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य केलेल्या कारवाई मागे घ्यावे,अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना कर्मचार्यांनी प्रमुख आगराच्या अत्याचाराचे पाढेच वाचले.ड्युटी नसतांना विनाकारण बसवून ठेवणे,कायद्या नसतांना रजेचा पगार व्यतिरीक्त मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करणे,हक्काच्या रजां नदेने, कर्मचाऱ्याच्या नात्यात मृत्यू झाल्यास रजा नदेता कामावर येण्यास आदेश देणे,पगार कपात का केला म्हणून विचारले म्हणून कामावरून काही कालवधी साठी कमी करने,कर्तव्यावर असताना कागदी रोल योग्य प्रमाणात नदेतां स्वतःचे पैसे खर्च करण्यास भाग पाडणे,चालक वाहक यांच्या विश्राम गृह सह शौचालयाची दुरावस्था असून जाणूनबुजन दुर्लक्ष करने,कर्मचारी मध्ये भेदाभेद निर्माण करणे, यासह अनेक समस्यांचे कथन केले.

आंदोलनाची घटना कळताच आमदार अनिल पाटील आंदोलनस्थळी येऊन कर्मचारी यांचे म्हणणे एकूण घेतले व याबाबत जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून योग्य कारवाई करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास सांगितले.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन उग्र होण्याच्या आत अमळनेरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे,पीएसआय नरसिंह वाघ,पीएसआय अक्षदा इंगळे,पोना सिद्धांत शिसोदे,पोना रवींद्र पाटील, पोना दिपक माळी,पोना बापू साळुंखे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कर्मचारी व आगार प्रमुख यांच्यात संवाद साधून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यास सांगितल्याने बस सेवा पूर्वरत सुरू करण्यात यश मिळवले.

अमळनेर आगारात एकही बस आरटीओ च्या नियमात बसत नाही तरी चालवण्याचा अट्टाहास केला जात असल्याचां गौप्यसफोट एका कर्मचाऱ्याने देशोन्नतीशी बोलतांना केला.

पत्रकार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

आंदोलनाचे वृत्तांकन करण्यास पत्रकार गेले असता त्यांच्याशी अरेरावी करून अपमानित केल्याचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला.तर या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!