गलवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृषिमंत्री अब्दुल सत्तार गटाच्या दीपाली औरंगे बिनविरोध–

सोयगाव(अमोल बोरसे) गलवाडा ग्रामपंचायतिच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी अध्यासी अधिकारी हेमंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती यावेळी सरपंच पदासाठी एकमेव सौ.दीपाली दीपक औरंगे यांचा अर्ज सभागृहात प्राप्त झाला त्यामुळे दुपारी दोन वाजेनंतर अध्यासी अधिकारी हेमंत तायडे यांनी दीपाली औरंगे यांची गलवाडा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची

घोषणा केली त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार गटाकडे गलवाडा ग्रामपंचायत ताब्यात गेली आहे..
सोयगाव शहारा जवळ असलेल्या गलवाडा ग्रामपंचायत च्या सरपंच पदाच्या निवडी साठी गुरुवारी विशेष सभा घेण्यात आली यावेळी सभागृहात ग्रामपंचायत च्या आठ सदस्या पैकी सात सदस्य हजर होते हजर सदस्यांमध्ये दीपाली औरंगे,मंगला बाई बिरारे,फिरोज पठाण,आस्माबी पठाण,सुशीलबाई इंगळे,रवींद्र जगताप, मधुकर इंगळे हे सात सदस्य हजर होते तर सखुबाई इंगळे गैरहजर होत्या दरम्यान सरपंच पदासाठी कृषिमंत्री अब्दुल सतार गटाच्या सौ दीपाली औरंगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला त्यामुळे सौ दीपाली औरंगे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासी अधिकारी हेमंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे विजय कोळी,तलाठी व्ही सी पवार,ग्रामसेवक सत्यनारायण पुललेवाड,सचिन ओव्हळ आदींच्या पथकाने निवडणूक चे कामकाज पाहिले यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली गलवाडा गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..
—-बिनविरोध सरपंच पदाची निवड होताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार गटाने गलवाडा गावात जल्लोष केला यावेळी भारत इंगळे,दत्तू इंगळे,जीवन पाटील, मिलिन सोनवणे(पोलीस पाटील),नंदू औरंगे, दीपक औरंगे,सोमनाथ औरंगे,सुरेश जाधव,संजय इंगळे,देवेंद्र बिऱ्हारे ,भारत तायडे,सचिन इंगळे,अक्षय औरंगे,ईश्वर जाधव,आदींनी जल्लोश केला…