वैभव हॉटेल जवळ दुचाकी घसरून शेतकऱ्याचा मृत्यू

सोयगाव (अमोल बोरसे ) शेतातुन घरी जातांना दुचाकि घसरून शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि. ११)रात्री बनोटी – नागद रोडवरील वैभव हाॅटेल जवळ घडली. शिवाजी शंकर शिंदे (वय ५५)असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहीती नुसार, शिवाजी शिंदे हे बनोटी शिवारातील गट क्रमांक १६९ मध्ये सूर्यफूल पिकास पाणी देण्यासाठी गेला असता रात्री वीजपुरवठा बंद पडल्याने दुचाकिने घराकडे निघाला असता नागद रोडवरील वैभव हाॅटेल जवळ दुचाकि घसरल्याने डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने मुलगा रवि शिंदे आणि सागर पाटील यांनी उपचारासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील खाजगी रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यु झाल्यावर बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी डॉ कृष्णा घावटे यांनी मृत घोषित करून उत्तरीय तपासणी केली. मयत शेतकऱ्याच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी बनोटी दुरक्षेत्रात नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर गिते, जमादार राजेंद्र, विकास दुबिले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील कार्यवाही करीत आहेत.