प्रताप महाविद्यालयातर्फे ‘Innovative, Incubation and Entrepreneurship’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजन.

0

अमळनेर ( प्रतिनिधि )प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी इंक्युबॅशन आणि इनोव्हेटिव्ह केंद्रातर्फे ‘Innovative, Incubation and Entrepreneurship’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ही प्राध्यापक वर्ग, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए बी जैन यांनी भूषविले व त्यांनी

इंक्युबॅशन केंद्राच्या कामकाजाबद्दल माहिती विशद केली.

इंक्युबॅशन केंद्राचे काम व त्याचे महत्त्व हे इंक्युबॅशन अँड इनोवेशन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. निलेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकांमधून सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील KCIIL (KBC NMU Jalgaon Centre for Innovative, Incubation and linkages) या विभागाचे निर्देशक प्रा. डॉ. विकास गीते व इंक्युबॅशन व्यवस्थापक श्री सागर पाटील हे होते.
प्रा. डॉ. विकास गीते यांनी इंक्युएशन सेंटरच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पना ही उदाहरणांसहित स्पष्ट केली व श्री सागर पाटील यांनी आगामी पाच वर्षात उद्योजक घडवणारे केंद्र म्हणून इंक्युबेशन केंद्र हे कसे नाव रूपात येईल याबाबत माहिती दिली.

या कार्यशाळेला प्रताप महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, आय क्यू एसी समन्वयक, संस्थेचे सहसचिव, सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन पाटील व वक्त्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा. वृषाली वाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंक्युबॅशन अँड इनोवेशन समितीचे सदस्य प्रा. डॉ. रवी बाळस्कर, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. जयेश साळवे व विद्यार्थी सागर सैंदाणे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!