जरंडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. ग्रामीण भागात ठिकठिकाणी अभिवादन..

सोयगाव (अमोल बोरसे) सोयगाव सह तालुक्यातील ग्रामीण भागात शाळा, ग्रामपंचायती,व गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सोयगाव शहरात मुख्य चौकात विविध राजकिय, सामाजिक, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले जरंडी येथे मुख्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त उत्साह शिगेला पोहचला होता दरम्यान जरंडी गावात ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत च्या वतीने अभिवादन करण्यात आले जरंडी उत्सव समितीच्या वतीने गावात जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जरंडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली प्रदीप जगताप, मधुकर सोनवणे यांनी बुद्ध वंदना घेतली यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष सुमित जगताप, सुमेध दांडगे,संतोष सोनवणे, सिद्धार्थ मोरे,संतोष मोरे, संजीवन सोनवणे, ईश्वर मोरे,यशवंत कोतकर आदींसह अनुयायी उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच संजय पाटील,राजेंद्र पाटील,रवींद्र पाटील दिलीप पाटील,मधुकर पाटील, साईदास पवार, संजीवन सोनवणे,सिद्धार्थ मोरे,लिपिक संतोष पाटील,आदींची उपस्थिती होती…