डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने जरंडी येथे वक्तृत्व स्पर्धा—

घोसला (अमोल बोरसे)…येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे शुक्रवारी (दि.१४) आयोजन करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईदास पवार, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यां

च्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली
वक्तृत्व स्पर्धेत वीस ते पंचवीस चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी स्पर्धेचा निकाल शिक्षक विलास वालदे यांनी जाहीर करून तिसरी ते पाचवी या प्राथमिक गटात मिसबा शेख( प्रथम),उन्नती शेख(द्वितीय) आणि प्रांजळ गुंजाळ(तृतीय) तर सहावी ते आठवी या गटात पायल मोरे(प्रथम) कोमल बाळनाथ(द्वितीय) तर अंकिता मोरे(तृतीय) या प्रमाणे मुख्याध्यापक बाळासाहेब सुळ,साईदास पवार,संतोष सोनवणे भिवा चव्हाण संजीवन सोनवणे यांचा पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी शिक्षक भुपेंद्र जांभूळकर, हितेश मेश्राम शिल्पा चौधरी, विलास वालदे आदींनी पुढाकार घेतला…