दिव्यांग रुग्णांसाठी नारायण सेवा संस्था दिव्यांग शल्य चिकित्साता शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद..

0

अंमळनेर (प्रतिनिधि )अमळनेर येथे कै.सुंदरबाई बन्सीलाल अग्रवाल स्मृती प्रित्यर्थ नारायण सेवा संस्था उदयपूर व जळगाव जिल्हा अग्रवाल

बजरंग सेठ अग्रवाल रुग्णांशी आस्थेवाईकपणे विचारपूस करताना

समाज च्या माध्यमातून दिव्यांग शल्य चिकित्सा तपासणी व निदान शिबिर चे आयोजन अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेस ला दिनांक 16/4/2023 रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले होते. सदरच्या शिबिर चे उद्घाटन ह. भ. प श्री प्रसाद जी महाराज (गादीपती संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले शिबिराला नारायण सेवा संस्थाचे प्रतिनिधी श्रीहरी प्रसादजी लड्डा, बजरंग लाल अग्रवाल, विनोद मित्तल धुळे, पवनजी अग्रवाल जळगाव, कैलास जी अग्रवाल शिरपूर, राजेश जी अग्रवाल जळगाव, ओमप्रकाश जी अग्रवाल धुळे व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. नारायण सेवा संस्थेच्या एकूण 6 डॉक्टर कडून 224 पेशंटची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण 61 दिव्यांग यांना पाय बसवण्यात येणार आहे. एकूण 36 दिव्यांग यांना हात बसवण्यात येणार आहे. चार दिव्यांग यांना ऑपरेशन साठी उदयपूरला पाठवण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगांचे मोजमाप घेतले गेलेले आहे त्यांना अमळनेर येथे बन्सीलाल पॅलेस ला दिनांक 9/7/23 ला हात किंवा पाव बसवण्यात येणार आहे. शिबिराला चोपडा, धुळे व अंमळनेर शहराचे विविध मान्यवर उपस्थित होत. शिबिरला यशस्वी करण्यासाठी मंगल ग्रह संस्था, अमळनेर महिला मंच, इंडियन मेडिकल असोसिएशन, अग्रवाल समाज अमळनेर, रोटरी क्लब, लायन्स क्लब च्या सर्व पदाधिकारी नी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कोचर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!