डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नकाणे रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण २० लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह साहेब यांच्या शुभहस्ते….

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील देवपुर भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नकाणे रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी तेथील नागरिकांनी धुळे शहराचे आ.फारुख शाह साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नकाणे रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे याची मागणी केली होती. त्याची आ.फारुख शाह यांनी तत्काळ दखल घेत या कामासाठी २० लक्ष रुपयाचा निधीचे पत्र आपल्या स्थानिक आमदार निधीतुन दिले होते.त्यानुसार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे कामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरला निकम व सूत्र संचालन राज वाघ यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आ.फारुख शाह यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोकुळ भामरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर भगवान गवळी, नगरसेवक कमलेश देवरे, प्रफुल्ल पाटील, डॉ.जितेंद्र ठाकूर, भटू अप्पा गवळी, राजू हाके, डॉ.दीपश्री नाईक, मंगला मोरे,बनूबाई शिरसाठ राजू बैसाणे, अजय झाल्टे, मुकेश वाघ, सनी वाघ, अनिल पवार गितांजली जाधव, मनिष शिरसाठ, रमा वानखेडे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन वानखेडे, शुभम साबे, आनंद वानखेडे होते.