जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल..

अमळनेर ( प्रतिनिधि )अमळनेर शहरातील सुभाष चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरातील सुभाष चौकाजवळ जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस नाईक रवींद्र पाटील दीपक माळी पोलीस कॉन्स्टेबल सिद्धांत छत्रपती यांनी पहाटे पाच वाजता अड्ड्यावर छापा टाकला. राजेश रमेश शिंदे (मोतीलाल नगर डेकोरोडे अमळनेर) याला अड्ड्यात सट्टा लावताना पकडले. त्याच्याकडून 980 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…