सोयगाव सह तालुक्यात ईदच्या सण शांततेत साजरा—

जरंडी (साईदास पवार).सोयगाव सह तालुक्यात रविवारी पहाटे पासून च ईदच्या सणाचा उत्साह संचारला होता दरम्यान तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी ईदची सामूहिक नमाज पठण करून ईद उत्साहात व शांततेत व उत्साहात साजरी केली दरम्यान सोयगाव व फर्दापूर दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८३ गावांमध्ये ईदचा सण उत्साहात साजरा झाल्या ची माहिती पोलीस निरीक्षक अनमोल केदार व फर्दापूरचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी संयुक्तपणे दिली
सोयगाव शहरातील सोयगाव-शेंदूरणी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर शहरातील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सोयगावात हिंदू-मुस्लिम एकमेकांना अक्षय तृतीया व ईदच्या शुभेच्छा देत होते त्यामुळे सोयगाव सह तालुक्यात मुस्लिमांचा पवित्र सण ईद व हिंदूंचा अक्षय तृतीया सण एकत्र आल्या ने हिंदू मुस्लिम एकतेच दर्शन सणानिमित्त पाहायला मिळाले दरम्यान सोयगाव शहरात पोलोस निरीक्षक अनमोल केदार तहसीलदार रमेश जसवंत यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सोयगाव सह तालुक्यातील ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता….सोयगाव शहरात तुराब शहा,
रशीद शेख मामू, शेरखा पठाण, अजीम देशमुख, नशिर पठाण , शाबु पठाण बिस्मिल्ला शेख आदींनी ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या….