नांदगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

जरंडी (साईदास पवार).सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव शिवारात शनिवारी सायंकाळी सात वाजता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला याप्रकरणी नांदगाव येथील पोलीस पाटील रमेश पवार,तिडका पोलीस पाटील रामचंद्र पाटील यांनी संयुक्तपणे सोयगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे सायंकाळी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव शिवारात गट नंबर २०७ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे.दरम्यान आठवडाभरापासून ही व्यक्ती बेवारस पणे रस्त्यावर फिरताना आढळून येत होती असे ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे अद्यापही या व्यक्तीची ओळख पटलेली नसून या मृत व्यक्तीचे वारसदार कोणीही नसल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे..त्यामुळे ही मृत व्यक्ती कुणाच्या ओळखीचा असल्यास या नंबर वर संपर्क करावा पोलिस निरीक्षक साहेब सोयगाव 9702099100 पोलीस पाटील नांदगाव 7517531372 पोलीस पाटील तिडका 8806654874 असे आवाहन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी केले आहे…रात्री उशिरापर्यंत या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार, यांच्या सह सोयगाव पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेला होता…