जागतिक शांततेच्या दुआने रमजान ईद साजरी झाली..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर संपूर्ण जगात शांतता नांदत राहो आणि बंधुभाव कायम राहो, अशी प्रार्थना करत आज ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली. शहरातील गांधलीपुरा ईदगाह मैदानावर शनिवारी
सकाळी साडेआठ वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आली. यामध्ये मौलाना नौशाद

आलम यांच्या पाठीमागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.मुस्लिम बांधव वेगवेगळ्या मार्गाने ईद गाह येथे पोहोचले. यंदाही भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. ईद च्या प्रार्थनेची तयारी आधीच झाली होती. प्रार्थनेनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार भूमिपुत्र अनिल पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, शिरीष चौधरी, डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी नगरसेवक मनोज पाटील, मोना पाटील, राजू संधानशिव, श्रीराम चौधरी,. , संतोष लोहरे, प्रताप शिंपी, प्रशासकीय अधिकारी संजय पाटील, भरत पवार, आदी उपस्थित होते व सर्वांना शुभेच्छा दिल्या.