अल्लाह हमारे देश के साथ साथ पुरी दुनिया मे अमन-शांती दे — मौलाना उस्मान.

जळगाव ( प्रतिनिधि )
अल्लाह हमे दोनो जहा मे कामयाब कर,पूरी दुनिया मे शांती के साथ साथ हम सबको अच्छे काम करने की तोफिक दे.. अशी प्रार्थना मौलाना उस्मान कासमी हे करीत असताना हजारोच्या संख्येत उपस्थित जनसमुदायाने त्यास आमीन म्हणून अनुमोदन दिले व साक्षात डोळ्यातील अश्रूने दुवा-प्राथनेचा समारोप करण्यात आला.
जळगाव शहरातील अजिंठां
चौक येथील मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टच्या मैदानावर ईद ची नमाज अदा केली गेली या वेळी जळगाव शहरातील सुमारे पंधरा हजार लोकांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक यांनी उपस्थित बंधूंना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.
शहर ए काजी मुफ्ती अतिकुर्रहेमान यांनी उर्दू प्रवचन दिले त्यात त्यांनी इस्लाम धर्माचे मानवते बद्दल असलेले स्पष्ट आदेश व्यतीत केले व आज या देशाला समानता व बंधू भावाची गरज असल्याचे नमूद केले.
ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी एका वर्षाचा संक्षिप्त आढावा द्वारे सुमारे १८ लाख रुपयाचा जमा खर्च सादर करून ट्रस्टच्या भावी योजनांबद्दल माहिती दिली.
मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज अदा केली त्यानंतर दुवा करून त्यांनी अरबी खुतबा-प्रवचन सादर केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा यांनी तर आभार ट्रस्टचे दुसरे सहसचिव मुकीम अहमद यांनी मानले.
नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
प्रशासन तर्फे मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एस राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी जयपाल हिरे, पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी आदींनी प्रत्यक्ष ईदगाह मैदानावर उपस्थित राहून सर्व मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
ट्रस्ट तर्फे प्रशासन व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्यासाहेब पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी आदींची उपस्थिती होती.
ईदगाह मैदानावर हजारोंची उपस्थिती
ईदगाह मैदानावर सुमारे पंधरा हजार लोकांची उपस्थिती होती प्रथमताच ट्रस्टने दोन दिवसापूर्वीच ईद च्या नमाजच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली असल्याने लोकांची उपस्थिती वेळेपूर्वीच होती.
मैदानावर यांची होती उपस्थिती
मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे रियाज मिर्झा,ताहेर शेख,एडवोकेट सलीम शेख,शरीफ पिंजारी, बादली वाला,रेहान खाटीक,माजी अध्यक्ष करीम सालार, एजाज मलिक, रहीम मलिक, माजी सचिव अमीन बादलीवाला, सय्यद चांद, डॉक्टर जावेद, प्रो डॉ एम इकबाल, जफर शेख,नुर बेलदार,आरिफ देशमुख, रागिबअहमद ,उमर फारूक, एडवोकेट शरीफ शेख, एडवोकेट आमिर शेख, या सह मुफ्ती सलिक सलमान,मुफ्ती रमीज, मुफ्ती शब्बीर,मेमन बिरादरीचे कादर कच्ची,शाकीर चित्तलवार, जाहगीरदार बंधू, नगरसेवक रियाज बागवान, इब्राहिम पटेल, हाजी युसुफ, अक्रम देशमुख,अन्वर खान, अहमद सर,रईस बागवान, मुजाहिद खान,बॉम्बे हार्डवेअर चे हाजी झकेरिया, यांच्या सह जळगाव शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
ट्रस्ट च्या कार्य साठी वर्गणी
भविष्यातील बांधकामासाठी चंदा करण्याचे आवाहन करताच उपस्थित समुदायाने स्वच्छेने सुमारे एक लाख साठ हजार रुपये जमा करून ट्रस्टच्या स्वाधीन केले.
क्षण चित्र
- मिनट टू मिनट कार्यक्रमाचा अनुभव प्रथमतः मुस्लिम समुदायाने अनुभवला.
- वेळेवर प्रवचन,नमाज सोबतच ट्रस्ट चा आढावा सादर झाल्याने उपस्थितांनी ट्रस्ट चे अभिनंदन केले.
- पोलीस विभागाचे वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्ष वेधून होती
- गर्दी व गर्मी असताना सुद्धा ईश्वर कृपेने पाणी व थंड पेय ची व्यवस्था तसेच मिनट टू मिनिट कार्यक्रम चालल्याने कोणताही अपघात घडला नाही.