अक्षयतृतीयेला स्तंभारोपण व ध्वजारोहणाने अमळनेरातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा शुभारंभ…

अमळनेर( प्रतिनिधि ) अमळनेर येथील संत सखाराम यात्रोत्सवास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ध्वजारोहण व ध्वजारोहण होऊन शुभारंभ करण्यात आला. या उत्सवानिमित्त वाडी संस्थान व नदीपात्र भक्तांनी फुलले होते, परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज तसेच सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सर्वप्रथम सर्व मान्यवर व भक्तगण वाडी संस्थांनच्या मंदिरात दाखल झाल्यानंतर आधी विठ्ठल रुक्माई चे दर्शन व पूजन होऊन त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता परमपूज्य संत प्रसाद महाराज भक्त गणासोबत वाजत गाजत नदीपात्रात दाखल झाले, यावेळी संत सखाराम महाराज संस्थांनच्या समाधीसमोर आधी अन्नपूर्णा पूजन झाल्यानंतर सुरुवातीला ध्वजारोहण व त्यानंतर स्तंभारोपण करण्यात आले,स्तंभरोपण संस्थानचे पुजारी अभय देव यांच्या हस्ते तर पौराहित्य जयप्रकाश देव,सुनिल देव,प्रशांत भंडारी,केशव पुराणिक,उदय पाठक, अभय जोशी यांनी केले. यावेळी समाधीसमोर टाकलेल्या शामियानात भक्तांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती, सुरुवातीला परमपूज्य प्रधान महाराजांनी विविध मान्यवरांना प्रसाद,नारळ आणि निमंत्रन पत्रिका देऊन यात्रोत्सवाची जबाबदारी दिली, त्यानंतर सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार स्मिता वाघ,जिजाऊ संस्थेच्या अध्यक्ष ऍड ललिता पाटील,खा शि मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे,उद्योगपती विनोदभैय्या,न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,न्यायाधीश गुलाबराव पाटील,डीवायएसपी राकेश जाधव,पोलीस निरीक्षक विजय शिंदे,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,प्रविण पाठक, पंकज मुंदडा,मनोज पाटील,भैरवी वाघ पलांडे,प्रा श्याम पाटील,वकील संघ अध्यक्ष दीपेन परमार,वसुंधरा लांडगे,महेंद्र महाजन,मनोहर महाजन,नितीन निळे,योगराज संदनशिव, संजय कौटिक पाटील,प्रताप शिंपी,प्रताप साळी, संजय चौधरी,सोमचंद संदानशिव,राजेंद्र यादव,पंडित चौधरी,अभियंता डीगंबर वाघ,श्रीराम चौधरी,बाळू पाटील,अप्पा येवले,महेश कोठावदे,उदय देशपांडे,पवन शेटे,मनोज भांडारकर, प्रा सुभाष महाजन,राजेश पाटील,सुनिल शिंपी,पीएसआय श्रद्धा इंगळे,शहर तलाठी स्वप्नील कुळकर्णी, विवेक भांडारकर, दोरकर,अनिल महाजन,चंद्रकांत साळी,सुनिल भोई,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सचिव चंद्रकांत पाटील ,जेष्ठ पत्रकार संजय पाटील, किरण पाटील,समाधान मैराळे, जितू ठाकूर,आर जे पाटील,मिलिंद पाटील,सुखदेव ठाकूर,महेंद्र पाटील,विजय पाटील तसेच महाराजांचे चोपदार सुभाष बागुल, प्रकाश बडगुजर, हिंमत बडगुजर, दिलीप बागुल,गणेश बागुल उपस्थित होते.