अक्षय भिल खुनाच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या १५० लोकांवर गुन्हा दाखल..

अमळनेर (प्रतिनिधि) दाजिबा नगर येथील अक्षय भिल याच्या हत्येचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील भिल्ल समाजाने एकत्र येत आरोपींना आमच्यासमोर उभे करावे, फाशी द्यावी, एन्काउंटर करावे या मागणीसाठी सुमारे तीन तास रास्ता रोको करून आंदोलन करणाऱ्या २६ जणासह अज्ञात १५० लोकांवर दंगल, सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ 25 रोजी भिल समाजाने महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करून किरकोळ दगडफेक केली. तसेच टायर जाळले आणि सामान्य नागरिकांना दादागिरी करून त्यांचे रस्ते अडवले. यामुळे अनेकांना त्रास झाला. पोलिसांची गाडी देखील आंदोलन कर्त्यांनी अडवली होती. आंदोलनात धुळे, शिंदखेडा, पारोळा, चाळीसगाव, अमळनेर ग्रामीण भागातून देखील भिल समाज एकत्र झाला होता. महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे पोलीस नाईक दीपक माळी यांनी फिर्याद दिली.