“समाजरत्न” पुरस्काराने प्रा एन के कुलकर्णी सन्मानित…

अमळनेर (प्रतिनिधि ) भगवान परशुराम जयंती चे औचित्य साधुन ह. भ. प. प. पू. प्रसाद महाराज यांच्या हस्ते समस्त समाजबांधव यांच्या उपस्थितीत वाडी संस्थानाच्या प्रांगणात, त्यांनी समाजीक व धार्मिक क्षेत्रात केलेले उल्लेखनिय कार्य आणि आर्थिक योगदानाबद्दल ‘समाजरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सर भडगाव येथील सौ र. ना. देशमुख आर्ट्स सायन्स आणि काॅमर्स काॅलेज मधुन उपप्राचार्य पदावरून सेवा निवृत्त असुन यापुर्वी ही सरना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सरांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..