एरंडोल येथे “जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची ” उपक्रम राबविण्या बाबत बैठक संपन्न.

एरंडोल ( प्रतिनिधी )एरंडोल येथे तहसिल कार्यालयात दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग एरंडोल मनिषकुमार गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली “जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची ” उपक्रम राबविणे बाबतचे नियोजन करणेकामी एरंडोल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व विभाग प्रमुख यांची बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.
सदर बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासकीय योजनांशी निगडीत विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणेकामी दिनांक १५ एप्रिल ते १५ मे २०२३ या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांचेकडुन अर्ज भरुन घेणे या बाबतची कार्यवाही करणे बाबत सर्व संबंधितांना सुचना दिली. तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी तहसिल कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती सादर केली. या बैठकीसाठी पोलिस निरीक्षक सतिष गोराडे,नायब तहसिलदार किशोर माळी,दिलीप पाटील,गटविकास अधिकारी दादाजी जाधव तथा तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी तहसिल कार्यालय, एरंडोल येथे महसूल नायब तहसिलदार यांचे अधिपत्याखाली जनकल्याण कक्षाची स्थापना करणेत आलेली असल्याचे व सदर कक्षाव्दारे नागरिकांच्या विविध समस्यांची सोडविणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करणेत येईल असे सांगण्यात आले.