गुन्हा दाखल होऊन देखील कारवाई होत नसल्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल..

.
एरंडोल ( प्रतिनिधी) एरंडोल मका खरेदी व्यवहारात सुमारे ३० लाख ६७ हजार २४२ फसवणूक झाल्याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याबद्दल संजय ओस्तवाल यांनी धरणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत माहिती अशी,कि धरणगाव येथील महावीर कॉटनचे भागीदार संजय समीरमल ओस्तवाल यांनी मका खरेदी व्यवहारात मनमाड येथील शुभम ट्रेडिंगचे संचालक शुभम राजेंद्र लुणावत आणि दिनेश कांतीलाल लुणावत यांचेविरोधात ३० लाख ६७ हजार २४२ रुपयांची फसवणूक केल्याबाबत धरणगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.सदर खटल्यात शुभम लुणावत आणि दिनेश लुणावत यांचेविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी व कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसाना दिले होते.धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊन देखील संशयितांविरोधात कोणतीही कारावाई करण्यात आलेली तसेच दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत देखील संपली असल्यामुळे संजय ओस्तवाल यांनी धरणगाव पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.संजय ओस्तवाल यांनी जाणूनबुजून न्याय नाकारला जात असून न्यायालयाच्या आदेशाने दाखल केलेल्या गुन्ह्याचे तपासाचे पूर्ण कागदपत्रे अवलोकनार्थ मागवण्यात यावे तसेच गुन्ह्याचा तपास इतरत्र वर्ग करण्याचे न्यायालयीन आदेश पारित करण्यात यावे अशी मागणी याचिकेत केली आहे.संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायाधीश ए.ए.ढोके यांनी सदर याचिका दाखल करून घेतली असून तपासाबाबत सविस्तर खुलासा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला.संजय ओस्तवाल यांचेतर्फे advt.मोहन शुक्ला काम पाहत असून त्यांना advt.कल्पेश पाटील,advt.सागर वाजपेयी सहकार्य करीत आहेत.