भारतीय महिला पहिलवान साठी जळगावचे महिला व पुरुष खेळाडूंचे प्रशासनाला साकडे..
महिला खेळाडूंना त्वरित न्याय द्या- एक मुखी मागणी..

जळगाव ( प्रतिनिधि) भारत देशाला ऑलिम्पिक खेळात तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीमध्ये पदक मिळवून भारताचे नाव अजरामर करणाऱ्या सात महिला खेळाडू सोबत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांनी अन्याय अत्याचार केला त्याबाबत त्यांच्यावर
गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी यासाठी महिला कुस्ती च्या खेळाडू दिल्ली येथे धरणे आंदोलनाला बसले असून त्यांना इतर पुरुष व महिला खेळाडूंनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे.

आज जळगाव जिल्हा विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी तथा क्रीडा संघटनाचे मार्गदर्शक फारूक शेख यांच्या नेतृत्वात हॉकी व फुटबॉल महिला व पुरुष खेळाडूंनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन दिले असून त्यात मागणी केलेली आहे की महिला पैहलवान सोबत झालेल्या अन्याय अत्याचारा बाबत कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाला त्वरित अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी एक मुखी मागणी केलेली आहे.
सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना महिला खेळाडू रोशनी राठोर यांच्या हस्ते देण्यात आले.
या खेळाडूंना भा साहेबांनी आश्वासित केले की आपल्या भावना त्वरित राष्ट्रपती भवन व केंद्र सरकारला कळविण्यात येईल.