आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच : धुळे शहराच्या विविधभागात विकास कामे..
— राज्यमार्ग लेखाशीर्ष अंतर्गत धुळे महामार्ग मोहाडी ते कुळथे पर्यंतच्या २ कोटी ३६ लाख रुपये रस्त्याचे सुधारणा करण्याचा कामाचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ…!

धुळे ( अनिस अहेमद ) धुळे शहरातून मोहाडी, रानमळा,मोघण, कुळथे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती हा मधला मार्ग धुळेकर व ग्रामीण भागातील नागरिकांना मोघणला जोडणारा असून या मार्गामुळे धुळेकर नागरिकांना थेट मधून शिरूडपर्यंत जाण्याचा शॉटकट मार्ग आहे. बहुतेक ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्याचा वापर करतात परंतु या रस्त्याची व्यवस्था फारच वाईट झाल्याने लोकांना या मार्गावर वापर करणे कठीण होत होते. यासाठी याभागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे हा रस्ता मंजुर व्हावा म्हणून मागणी केली होती. आमदार फारुख शाह यांचे काम धुळे शहरात चालूच असून ग्रामीण भागातील कब्रस्थान व अन्य सुविधांसाठी सुद्धा आमदार फारुख शाह शासनाकडून निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच हा एक भाग म्हणून हा रस्ता धुळे शहरातील लोकवस्तीतून जात असल्यामुळे महत्वाचा व जास्त रहदारीचा होता. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करणे व विविध ठिकाणी पाईप-मोरी करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार साहेबांच्या प्रयत्नाने या रस्त्यासाठी हा निधी मंजुर झालेला आहे. त्याचे आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामूळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचे आभार मानलेले आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस माजी नगरसेवक विनायक शिंदे,युवा नेते आकाश शिंदे,नगरसेवक गनी डॉलर,नगरसेवक मुक्तार अन्सारी,माजी नगरसेवक,साबीर सैय्यद,निजाम सैय्यद,प्रविण अग्रवाल,कुणाल पवार,प्यारेलाल पिंजारी,योगेश शिंदे,महेंद्र राजपुत,आसिफ पोपट शाह,,जमील खाटीक,सोनू भादाने,मोहन मराठे,नितीन पाटील,संदीप शिंदे,गणेश बडगुजर,अमोल शिंदे,प्रविण पाटील,वाहिद सैय्यद,मंगेश खैरनार, बलजित बग्गा,सतार शेख,मुस्ताक शाह,नजर खान मनोज शर्मा, व मोठ्या प्रमाणात शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक उतसेच उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे,कनिष्ठ अभियंता विकास लोकरे पस्थित होते.