“चतुरंग”व “फुलामुलांची शाळा” काव्यसंग्रहाचे शनिवारी प्रकाशन..लेखिका रेखा – मराठे पाटील…

अमळनेर (प्रतिनिधि ) अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षिका रेखा वाल्मीक मराठे-पाटील लिखित “चतुरंग” व “फुलामुलांची शाळा” या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा शनिवारी (ता.२९) सायंकाळी साडेचारला येथील पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूलच्या रोटरी क्लब हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठराव गायकवाड अध्यक्षस्थानी राहतील. विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी, डायटचे अधिव्याख्याता डीबी साळुंखे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोळी हवं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.