ब्रह्मा -विष्णू -महेश ,यांचे रूपच जन्माला आल्याची अनुभूती.. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश..

रावेर (राहत खाटीक) गुरुवारी १० वाजून ४५ मिनिट १० वाजून ५० मिनिट व १० वाजून ५५ मिनिट असं अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या बाळाला कविता राजकुमार कापडे हिने जन्म दिला.

तिघेही बाळ हे पायाळू जन्माला आलेत. कविता कापडे ही लालबाग बऱ्हाणपूर येथील राहणारी असून, बहादरपूर येथील माहेर वाशिनी आहे. तिघही बाळ हे पायाळू जन्माला आलेले असून डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरी केल्यामुळे व तिघही बाळ सुखरूप असल्यामुळे राजकुमार दिलीप कापडे व सर्व नातेवाईक मंडळी हे डॉक्टरांचे आभार मानून कौतुक करीत आहेत. अतिशय गुंतागुंतीच्या अशा असलेल्या या प्रसूतीला नॉर्मल प्रसूती करून तिघही बाळांची तब्येत सुदृढ असल्यामुळे व डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे परिसरात यासंदर्भात आनंदाची चर्चा चालू आहे. डॉक्टर योगिता पाटील यांनी जन्माला आलेल्या बाळांचे तपासणी करून सर्वाची योग्य ती जन्म पश्चात काळजी घेतलेली आहे . बाळांचे वजन अनुक्रमे २.६ २.५ व २ केजी आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गुरुवारी ब्रह्मा-विष्णू- महेश याचे रूपच जन्माला आल्याचे समजून माऊली हॉस्पिटल येथे एकच गर्दी उसळलेली आहे.