अमळनेर तालु्यात वादळी पाऊस सह गारपीट,शेकडो झाडे उन्मळलीं…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील उत्तरेला असलेल्या गावामध्ये वादळी पाऊस सह गारपीट झाली आणि शेकडो झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब ,तारा तुटून वीज पूरवठा खंडित झाला आहे.
कलाली ,सात्री ,करणखेडे निंभोरा आदी ठिकाणी वादळ आणि गारपीट झाली.गावातील व परिसरातील शेकडो झाडे उन्मळली आहेत. सात्री येथे जागेश्वर मंदिराचे पत्रे उडाली तर केळीचे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाला आहे. निंभोरा येथे घरावर झाड पडले मात्र जीवित हानी झाली नाही. गंगापुरी येथे देखील वादळी पावसाने विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. मारवड रस्त्यावर धानोरा फाट्यावर झाड पडल्याने बराच वेळ वाहतूक खोळम्बली होती.अखेर नागरिक व पोलिसांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला.