अमळनेर तहसील आवारातून वाळू ट्रॅक्टर चोरणारे चोरटे गजाआड .. अमळनेर पोलिसांची धडक कारवाई.

0

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तहसिल येथून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरट्यांनी चोरले होते प्रविण साहेबराव शिरसाठ, कोतवाल, जलोद यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.न. 151/2023 भा.द.वि. कलम 3792, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर ट्रॅक्टर चोरीचे अस्पष्ट फुटेल मिळाले होते तसेच आरोपीतांनी गुन्हा करते वेळी तोंडाला रुमाल बांधलेले असल्याने त्यावरून आरोपीतांची ओळख पटत नव्हती. अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी सप्तौ रामकृष्ण कुमावत व पोना मिलींद भामरे अशांना योग्य त्या संचुना देवुन य गुन्हा उघडकीस येणे करीता आवश्यक ते मार्गदर्शन करुन आरोपीतांचा कसोशिने शोध घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे नमुद गुन्हा उघडकीस येणे करीता सफ़ौ रामकृष्ण कुमावत व पोना, मिलींद भामरे अशांनी ट्रॅक्टर मालक प्रविण जगन्नाथ पारधी यांस ताब्यात घेतले व ट्रॅक्टर व ट्रॉली बाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने गुन्ह्यांतील चोरी केलेले 2,50,000/- रु.कि.ची ट्रॅक्टर क्र. एम. एच. 19 सी. जे 1404 व 1,00000/- रु. कि.ची ट्रॉली एम. एच. 19/5958 असे काढुन दिले असुन सदरची ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी केले असल्याबाबात कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यांत आरोपी प्रविण जगन्नाथ पारधी रा. जानवे ता. अमळनेर यांस अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन गुन्ह्यांचा अधिक तपास सफ़ौ ,रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सफा / रामकृष्ण कुमावत व पोना / मिलींद भामरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!