अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत..

अमळनेर ( प्रतिनिधि )
महाविकास आघाडी 11 भाजपा 4 तर अपक्ष 1 अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला 16 जागा पैकी 11 जागेवर विज
य मिळवला आहे आमदार अनिल दादा पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलला दणदणीत विजय मिळवला आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकुण 18 जागांसाठी निवडणूक होती व्यापारी मतदार संघाचे दोन्ही जागा बिनविरोध निवड झाली होती सोळा जागेसाठी मतदान झाले यात महाविकास आघाडीला 11 भाजपा 4 तर अपक्ष 1असे उमेदवार निवडून आले आहेत निवडणून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे

सोसायटी जनरल मतदार संघ
१) स्मिताताई वाघ- 726 ( भाजपा )
२) अशोक आधार-721 ( महविकास आघाडी )
३) सुभाष जीभाऊ-656 ( महविकास आघाडी )
४) सुरेश दादा- 507 ( महाविकास आघाडी )
५) अशोक डॉक्टर-421 ( महविकास आघाडी )
६) नितीन बापूराव-409 ( अपक्ष )
७) भोजमल दादा-394 ( महाविकास आघाडी )
सोसायटी महिला मतदार संघ
१) सुषमा देसले – 634 ( महाविकास आघाडी )
२) पुष्पा पाटील – 593 ( महाविकास आघाडी )
सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघ
समाधान धनगर विजय 603 ( महाविकास आघाडी )
ग्राम पंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
भाईदास भिल, विजय 433 ( महाविकास आघाडी )
सोसायटी ओ बी सी मतदार संघ
डॉ अनिल शिंदे विजय 722 ( महाविकास आघाडी )
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
सचिन बाळु पाटील विजय 510 ( महाविकास आघाडी )
प्रफुल्ल पाटील विजय 506 ( भाजपा )
ग्राप अनुसूचित आर्थिक दुर्बल मतदार संघ
हिरालाल पाटील विजय 481 ( भाजपा )
हमाल मापाडी मतदार संघ
शरद पाटील विजय 195 ( भाजपा )असे निवडून आलेले उमेदवार आहेत आजी माजी आमदार विरूद्ध तीन माजी आमदार असा हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चित्र होता आज शहरातील स्टेशन रोडवरील व्यापारी लायब्ररी येते मत मोजणी सुरू होती सकाळ पासूनच निकालाची उत्सुकता होती शेवटी आमदार अनिल दादा पाटील यांचे महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले
…