गरजू महिलांना मदत करून वळगाव शेतीत ईद साजरी शेर – ए- अली फाउंडेशन’चा विधायक उपक्रम , गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप..

पुणे (प्रतिनिधी)
रमजान ईद च्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा ‘ शेर – ए – अली फाउंडेशन’च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप तसेच शेकडो महीलानां घरगुती वस्तू वाटप व लहान मुलांना बर्गर व शिरखुर्माचे तसेच स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाला वडगाव श्री व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला . कार्यक्रमाचे आयोजन ‘ शेर – ए – अली फाउंडेशन’चे संस्थापक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष फिरोज खान , अध्यक्ष चिराग खान , कार्याध्यक्ष सॅन्डी शिंदे , उपाध्यक्ष अफजल खान यांनी केले होते . यावेळी ‘ शेर – ए – अली फाउंडेशन’चे संस्थापक फिरोज खान म्हणाले की , ” देशात बेरोजगारी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बहुतांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आपले जीवन जगत आहेत , त्यांची आर्थिक परिस्थिती
लागते . महिलांवरील कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना कामासाठी शहरात किंवा इतर राज्यात जाणे शक्य होत नसल्याने महिला घरबसल्या लघुउद्योगाच्या शोधात असतात.या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना कुटुंबाच्या पालनपोषणाची जबादारी काही प्रमाणात घेता यावी तसेच स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोफत शिलाई मशीनचे वाटप ” शेर – ए – अली फाउंडेशन ” च्या वतीने करण्यात आले आहे ” . यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते बाळासाहेब जानराव , नारायण गंलाडे , माजी नगरसेविका ऊषाताई कळमकर , आरतीताई सोनाग्रा , माजी आमदार बापूसाहेब पठारे , शनि शिंगारे , सुरेन्द्र पठारे , नौशाद शेख , माजी नगरसेवक राहुल भंडारे , अजिज शेख , अॅड . वाजेद खान , ॲड . खेमु राठोड , फिरोज पठाण , अनिल परदेशी , राहुल शिरसाट , प्रदिप साठे , आशिष माने , हबीब सैय्यद , विरेन साठे , सनि निकाळजे , दिपक भंडलकर , रुहिनाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईम्रान शेख , सादिक पठाण , अजिम शेख , अजहर खान , सहिल शेख , अबुजर खान , साहिल शेख , परवेश खान , पंकज माने , अभि पाटोडे , रुखमोद्दिन खिस्तके , अल्तमश खान , शोहेब शेख व फाउंडेशनच्या इतर सभासदांनी मोलाचे योगदान दिले . फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक विधायक उपक्रम आयोजित केले जातात . त्यामध्ये आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर यांचे देखील आयोजन केले जाते .