रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न.

रावेर (प्रतिनिधी )
रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक आज दिनांक1. मे दुपारी12. वाजता रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस विश्रामगृह सावदा रोड रावेर येथे बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली.
या बैठकीला रतन भालेराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वंचित बहुजन

न आघाडी हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली पाहिजे. आणि श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले पाहिजे. असे रतन भालेराव यांनी सांगितले. सुरेश अटकाळे आपल्या मनोगतात म्हणाले की आपल्याला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करून घराघरापर्यंत श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचे काम करण्याची पद्धत लोकांपर्यंत पोहोचायची आहे असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष म्हणाले की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा 10. मे . हा वाढदिवस सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करीत असतो. आता पण आपल्याला श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस हा विविध कार्यक्रमांनी सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करायचा आहे. त्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीने आपल्या गावात साजरा करायचा आहे. आणि आपण रावेर शहरामध्ये सुद्धा पक्षाने ठरविलेल्या नियमानुसार सामाजिक सप्ताह साजरा करणार आहे. असे अध्यक्ष भाषणामध्ये बाळू शिरतुरे म्हणाले.
या बैठकीला रतन भालेराव, सुरेश अटकाळे, ज्ञानेश्वर तायडे, समाधान हिवरे, शंकर लहासे, राजेंद्र अवसरम ल, , कंदरसिंग बारेला, प्रकाश तायडे, मनोहर तायडे, प्रतीक दामोदर, दौलत अडांगळे, तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षा मध्ये प्रवीण हिवरे भातखेडा, शंकर लहासे रायपूर, अजय तायडे कर्जोद इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या बैठकीचे सूत्रसंचालन सलीम शहा यासीन शहा यांनी केले तर आभार अर्जुन वाघ यांनी मानले.